न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- भोसरी एमआयडीसीमधील फिनिक्स मायक्रो सिस्टिम कंपनीत फिल्ड अभियंता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने २ लाख ४३ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार दाखल झाली आहे.
कंपनीच्या आवारातून एक ऑक्टोबरच्या रात्री एलसीडी, ग्राइंडर, टच स्क्रीन असे साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद प्रशांत वसंतराव वाळुज (वय ३८, रा. बन्सल सिटी, दिघी रोड, भोसरी) यांनी दिली आहे. याप्रकरणी महादेव बिरादार यांच्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.















