- ओबीसींच्या महाज्योतीचे काय; ओबीसी संघर्ष संघटनेचं पिंपरीत आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- ओबीसी भटक्या विमुक्त जाती – जमातींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करून ओबीसींना सावत्रपणाची वागणूक देत आहेत. मराठा समाजासाठी असणाऱ्या सारथीला १२१० कोटींची तरतूद करणारे सरकार ओबीसींसाठी असणाऱ्या महाज्योतीला मदत देत नाही.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी संघर्ष सेनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ओबीसी जागर आंदोलन केले. ओबीसी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी जातनिहाय जनगणना, नोकर भरती, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, ओबीसींचा मेडिकल कोटा अशा अनेक प्रलंबित प्रश्नावर प्रहार केला. या वेळी ओबीसी नेते सुरेश गायकवाड, डॉ. पी. पी. कुंभार, बारा बलुतेदार प्रांत उपाध्यक्ष प्रताप गुरव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, गणेश बालुंजकर, विशाल जाधव, आनंदा कुदळे, समता परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ, शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी आक्रमक भूमिका मांडली.
आदोलनात राजकुमार परदेशी, अनिल पक्ष साहुके, भारत भोसले, संपर्कप्रमुख विष्णु कुन्नाडे आदी उपस्थित होते. आभार माऊली चोराटे यांनी मानले.















