नवी दिल्ली- व्हॉट्सअॅपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) व्हॉट्सअॅपला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने माहिती-तंत्रज्ञान आणि अर्थ मंत्रालयालाही नोटीस पाठविली आहे. येत्या चार आठवड्याच्या आत नोटीशीला उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. गेल्या आठवड्यात माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांची भेट घेतली होती. यावेळी, रवीशंकर प्रसाद यांनी ख्रिस डॅनियल यांना भारतामध्ये लवकरात लवकर तक्रार अधिकारी नेमण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. फेक मेसेज व इतर तक्रारींच्या जलद निवारणासाठी व्हॉट्सअॅपने एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच व्हॉट्सअॅपद्वारे, पसरविण्यात येणारा अक्षेपार्ह मेसेज रोखण्यासाठी तांत्रिक समाधान शोधावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यांनी दिली होती.
व्हॉट्सअॅपमुळे केंद्र सरकार अडचणीत ; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
















