नवी दिल्ली : देशातील आगामी लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरच्या सहाय्याने घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
काँग्रेसने पुन्हा एकदा बॅलेट पेपर वापराचा पुनरूच्चार केला असून 2 ऑगस्टला काँग्रेससह तेलगू देसम पक्ष, राष्ट्रीय जनता दल यापक्षांनी देखील बॅलेट पेपरचा आग्रह धरला होता. गेल्या निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशामुळे काँग्रेस इव्हीएमवर अविश्वास दर्शवत आहे.असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेसने फुंकले रणशिंग, आगामी लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या.
















