न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- शहरात विविध ठिकाणी तीन दुचाकींची चोरी झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. आकुर्डीतील हॉटेल धनश्री समोरून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार कौस्तुभ चंद्रकांत घाग (वय २९, ओझोन ग्रीन, तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
एचपी चौक ते वासुली रस्त्यावरील पानसे ऑटो कंपनीच्या वाहन तळातून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद अमोल विनायक भांगरे (वय ३५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. राहत्या घराजवळून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार आनंद बाळासाहेब सोनावणे (६१, रा. मोरया पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.