- तीन टक्के सवलतीमुळे राज्यभरात दस्त नोंदणीत सुधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- राज्य शासनाने बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहिर केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत दस्त नोंदणीत चांगलीच वाढ झाली असून, शासनाच्या महसुलात देखील मोठी भर पडत आहे.
जुलै महिन्यात राज्यात केवळ १ लाख ६५ हजार १३९ दस्त नोंदणी झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात या मध्ये तब्बल ७५ हजारांची वाढ होऊन दस्त नोंदणी २ लाख ४० हजारांवर जाऊन पोहचली. यामध्ये दसरा – दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
राज्यात मार्च महिन्यात आलेली कोरोना महामारी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यावसायला बसला होता. याचा शासनाच्या एप्रिल महसुलावर देखील फार मोठा परिणाम झाला. यामुळेच राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहिर केली. शासनाच्या या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत आहे.