न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- करोना महामारीच्या संकट काळात विविध प्रकारे समाजसेवेचा हात पुढे करणारे करोना योद्धे, समाजसेवक यांचा सन्मान मुनीश्री चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आणि वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम या संस्थांच्या वतीने करण्यात आला.
शहरातील ४८ स्वयंसेवी कार्यकत्यांचा चिन्मयसागर करोना वॉरियर अवार्ड -२०२० ‘ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. चिंचवड उद्योगनगर येथे प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. देवेंद्र बाकलीवाल, नंदकुमार ढोले यांच्या हस्ते हा सन्मान केला.
डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अमित पांडे, डॉ. सुनील लोहाडे, देवेंद्र बाकलीवाल, सूर्यकांत मुथीयान, नेमीचंद ठोले, विरेश छाजेड, संतोष धोका, महेंद्र गंगवाल, पीयूष पांडे यांना चिन्मय सागर करोना वॉरियर अवॉर्डचे सन्मानपत्र देण्यात आले. कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त कार्यकत्यांना ऑनलाइन पाठविण्यात आले. राहुल पगारिया, विपुल पगारिया, शुभम पगारिया, सुरेश गादिया, राजेश सांकला, डॉ. सुहास बोरा, राजेंद्र शेठीया, संतोष लुंकड, जवाहर चंद्र मुथा, शरद लुणावत, मनोज सोलंकी, नितीन बेदमुथ्था, प्रकाश भंडारी, सुभाष चुत्तर आदींचा त्यामध्ये समावेश आहे.


















