- नगरसेवक प्रवीण भालेकर यांचा महावितरणाला इशारा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- रुपीनगर, त्रिवेणीनगर व तळवडे परिसरामध्ये वारंवार वीज होत खंडित आहे. येथील ट्रान्सफार्मवर क्षमतेपेक्षा अधिक लोड आहे. तसेच केबलदेखील खराब झाल्या आहेत. या भागात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी महावितरणला दिला आहे.
रुपीनगर येथील अष्टविनायक कॉलनी आणि श्रीराम कॉलनी येथील ट्रान्सफार्मवर क्षमतेपेक्षा अधिक लोड आहे. यामुळे या भागात वीजेची जादा मागणी आल्यावर वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. या ठिकाणचा ट्रान्सफार्मर फुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रुपीनगर परिसरातील इंद्रायणी धर्म येथील कॉलनीला वीज पुरवठा करणाऱ्या केबलला आठ ठिकाणी ज्वाइंट मारण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील वीज वारंवार खंडित होत आहे.
या भागातील केबल बदलल्यास हा प्रश्न मार्गी लागून नागरिकांची समस्या सुटू शकते. यामुळे वरील दोन्ही बाबींचा विचार करून त्वरीत उपाययोजना करावी , अन्यथा नागरिकांना घेऊन कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रवीण भालेकर यांनी महावितरणचे उपअभियंता चौधरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


















