नवी दिल्ली – श्रीनगर येथील एका हाॅटेलमध्ये मे महिन्यात एका स्थानिक महिलेसोबत सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या ताब्यात असलेले मेजर लितुल गोगोई हे आर्मी कोर्टाच्या चौकशीत दोषी ठरले आहे.
आर्मी कोर्टाने त्यांना कामावर असताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी धरलं आहे. याशिवाय आदेशांना न जुमानता स्थानिकांशी जवळीक साधण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे आता मेजर लितुल गोगोई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
पोलिसांनी त्यांना २३ मे रोजी एक विवादानंतर ताब्यात घेतल होते. ते कथितरित्या एका १८ वर्षीय महिलासोबत श्रीनगर येथील एका हाॅटेलमध्ये जाऊ इच्छित होते. तिथे त्यांचा हाॅटेल कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर पोलिंसानी मेजर गोगोई आणि महिलेला ताब्यात घेतलं होते. याप्रकारानंतर सैन्य दलाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.
संबंधित बातमी नेमकं काय होत प्रकरण
कोण आहेत मेजर लितुल गोगोई
श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील बीरवाह भागामध्ये जमावाकडून होत असलेल्या दगडफेकीपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी लष्कराने फारुख अहमद डार या स्थानिक तरुणाला जीपला बांधले होते. दगडफेक करणाऱ्या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी मेजर गोगोई यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर मेजर गोगोई हे प्रसिध्दी झोतात आले होते.











