- आरपीआयचे रामदास आठवले, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनाही कोरोनाने जखडले….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२०) :- आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
“सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,” असं तटकरे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संदर्भातील माहिती दिली आहे.