न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- आरोपीने आणि त्याच्या मित्राने मुलाच्या वाढदिवसासाठी बाहेर जाण्याचे कारण सांगून दोन दिवसांसाठी फिर्यादी यांची कार नेली. ती कार अद्यापही फिर्यादींना परत केली नाही.
फिर्यादीने कार मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचा विश्वासघात व फसवणूक केली. हा प्रकार १२ जुलै २०२० रोजी लिंक रोड, चिंचवड येथे घडला.
याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे (वय ४३, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २७) रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक खरात (रा. किवळे रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.












