न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- गेल्या काही महिन्यांपासून सांगवी परिसरात विदेशी नागरिकांचा विविध गुन्ह्यांत सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी त्यांची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी, अशी सूचना सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिल्या आहेत.
रंगनाथ उंडे म्हणाले, की परिसरात घर भाड्याने किंवा विक्री करताना घ मालक व रिअल इस्टेट एजेंट यांनी काळजी घ्यावी. घर भाड्याने देताना विदेशी नागरिक व खास करून नायजेरियन पुरुष व महिला यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच, रजिस्टर भाडेकरार आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून घर भाड्याने द्यावे. सदर व्यक्ती कोणता व्यवसाय करतो, त्याचे अवैध व्यवसाय आहेत का आदी गोष्टींवर लक्ष द्यावे.












