न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. या विभागासाठी सक्षम अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. योग्य वेळी तांबे यांच्यावर कारवाई करू, असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
तांबे यांच्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात हर्डीकर म्हणाले की, पाणीपुरवठा विभागात काम करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. पाण्याचे नवे श्रोत वाढविण्यावर पालिका प्रशासन भर देत आहे. पवना जलवाहिनी संदर्भात तांबे हे माहिती देत नाहीत.












