- वाकड पोलिसांची धडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे शनिवारी अज्ञात सहा जणांच्या टोळक्यासह दोन अल्पवयीन मुलांनी घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय पवार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. मुख्य आरोपीने पूर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत कोयत्याने वार केले. शिवाय त्यांच्या घरावर, दरवाजा, खिडकी दगड भिरकावले होते. या घटनेमुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते.
दरम्यान, वाकड पोलिसांनी आज सोमवारी (दि. २) त्यांच्या हद्दीतील सहा आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी मुळशी पॅटर्न स्टाईल धिंड काढत टक्कल केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी काही तासातच मुख्य आरोपी कवठेकरसह सर्वांना अटक केली. यावेळी सर्व नागरिक रस्त्यावरून नेणाऱ्या गुंडाना पाहात होते. पुढे आणि पाठीमागे पोलीस अधिकारी होते.
शुभम निवृत्ती कवठेकर (वय २३, रा. बिबवेवाडी, पुणे), दीपक नाथा मिसाळ (वय २३), मंगेश मोतीराम सकपाळ (वय २३, दोघेही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजाळी (वय १९), आकाश महादेव कांबळे (वय २२), सनी गौमत गवारे (वय १९, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींना न्यायलयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. या कोठडीचा सोमवारी अखेरचा दिवस होता.
















