- आज १६० जणांना कोरोनाची बाधा; ०६ जणांचा मृत्यु तर १३९ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०६ नोव्हेंबर) रोजी १६० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील ०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले दोन पुरुष रुग्ण व दोन स्त्री रुग्ण हे थेरगाव (वय ३८ वर्षे),निगडी (६१) वर्षे, पिंपरी (७५ वर्षे), भोसरी (७० वर्षे) येथील रहिवासी आहे. तर हद्दीबाहेरील ४७ वर्षीय पुरुष रुग्ण अहमदनगर येथील तर ६४ वर्षीय स्त्री रुग्ण हिंजवडी येथील रहिवाशी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८५८२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५२१३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५४२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.