- शालेय शिक्षण मंत्र्यांकडून उद्यापासून २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टीची घोषणा…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी असल्याचं जाहीर केलं आहे.
उद्यापासून (शनिवार) ऑनलाइन शिक्षणासाठी २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे हे जाहीर केलं. मात्र आधी पाचच दिवसांची सुट्टी दिल्याने अनेकजण हिरमुसले होते. आता मात्र ही सुट्टी २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.