न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून करून वर्षभरापासून फरार असणाऱ्या नराधम सावत्र बापास पोलिसांनी अटक केली. तब्बल सातशे ते आठशे सीसीटीव्हीचे छायाचित्रण तपासून तांत्रिक विश्लेषणाधारे आरोपीला भोसरी पोलिसांनी गोव्याला पळून जाण्याच्या प्रयत्नातील आरोपीस पुणे रेल्वे स्थानकावर बेडवा ठोकल्या.
विजय बबन चव्हाण (वय ४०, रा. दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीवर (वय १५ वर्षे) बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना डिसेंबर २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात आरोपीने पळून जाण्यासाठी रिक्षा वापरल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तब्बल सातशे ते आठशे सीसीटीव्हीचे चित्रण तपासले. त्यानुसार संबंधित रिक्षा भूगाव येथे सापडली. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.
आरोपी वेशभूषा बदलून एका महिलेसह गोव्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वेस्थानक आणि ससून परिसरात सापळा रचला. पोलिसांना त्याने अजय दीनानाथ असे नाव सांगून पळ काढण्याचा प्रयल केला.