- आज ९७ जणांना कोरोनाची बाधा; ०४ जणांचा मृत्यु तर १६१ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०७ नोव्हेंबर) रोजी ९७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील ०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले तीन पुरुष रुग्ण व एक स्त्री रुग्ण हे जुनी सांगवी (वय ८५ वर्षे, वय ४५ वर्षे), काळेवाडी (वय ७० वर्षे) शहरातील मृत झालेली एक स्त्री रुग्ण निगडी प्राधिकरण (वय ६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८६७८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५३७४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.