- मराठी रंगभूमी दिनानिमित्त कलावंतांचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त कलावंतांचा गौरव करण्यात आला. स्मिता कुलकर्णी (अभिनेत्री), प्रदीप तपस्वी (नेपथ्यकार) व सुधीर मारुलकर (रंगभूषाकार) या रंगकर्मीना दिग्दर्शक संजीवकुमार पाटील व परिषदेचे अध्यक्ष भोईर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नाट्य परिषद शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, शहरातील नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याने नाट्यकर्मीमध्ये उत्साह संचारलेला आहे. नाट्यविषयक संस्थांनी नाट्यकलेची जोपासना करणे गरजेचे आहे. तसेच, ५० टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह चालू होणार असल्याने नाट्यगृहाचे भाडेसुद्धा ५० टक्के केले जावे, असा प्रस्ताव पालिकेला देणार आहे. नाट्य परिषदेचा रौप्यमहोत्सव असून, नाट्य महोत्सव व नाट्य विषयक कार्यक्रम वर्षभर घेणार आहोत. शहरातील सर्व संस्थांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे.
यावेळी परिषदेचे संतोष शिंदे, राजेंद्र बंग, महेश लाकाळ, माधव जोगळेकर, आर. के. चौधरी उपस्थित होते. सुहास जोशी व किरण येवलेकर यांनी संयोजन केले. गौरी लोंढे यांनी सूत्रसंचालन तर सत्कारार्थीचा परिचय सुहास जोशी यांनी करून दिला. नरेंद्र आमले यांनी आभार मानले.