न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून फटका स्टॉलसाठी अर्ज स्वीकारणे सुरु केले आहे. दहा ते बारा स्टॉलला परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीच्या अगोदर साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी विविध ठिकाणी स्टॉल उभे राहतात.
यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचा प्रदूषणाचा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अग्निशमन विभाग या संदर्भातील आदेशाची वाट पाहत होते. मात्र, तशी कोणतीच सूचना न आल्याने फटका स्टॉलला परवानगी देण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरवात करण्यात आली आहे.