न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळ व राजमाता जिजाऊ क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, सुधीर मुंगसे, विराज लांडे, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, रजिस्ट्रार अश्विनी भोसले आदी उपस्थित होते. कार्यशाळेत एकूण २८८ उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
पोलिसांचे समाजातील स्थान व गरज लक्षात घेता तरुणांनी पोलिस सेवेत भरती होऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन विलास लांडे यांनी केले. प्रा. वामन गव्हाणे, प्रा. मयूर जायभाय, प्रा. गणेश शिंदे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजन राजमाता जिजाऊ क्रीडा प्रतिष्ठाण व डॉ गणेश चव्हाण, प्रा. सुनील वंजारे, प्रा. आकाश गावडे, प्रा. रोहित गुरव, प्रा. चेलम भामरे, प्रा. आर.बी. पाटील यांनी केले.