न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- काळेवाडीतील आदर्शनगर येथे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने साईनाथ दादाराव माखले (रा. सर्वे नं ८३-१, बीआरटी रोड, आदर्शनगर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
महानगरपालिका अधिनियम आणि मुंबई प्रांतिक पालिका अधिनियमानुसार आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परिसरात अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.