- शहरात आज २४६ जणांना कोरोनाची बाधा; सात जणांचा मृत्यू, तर ८८ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) रोजी २४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सात जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९१२८४ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – कासारवाडी (५६ वर्षे) , मोहननगर (४८ वर्षे), वाल्हेकरवाडी (४४ वर्षे) ०२ स्त्री – वाल्हेकरवाडी (६० वर्षे), भोसरी (८० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – जुन्नर (६७ वर्षे), सातारा (७८ वर्षे) येथील रहिवासी आहेत. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७५४९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६०० जणांचा मृत्यू झालेला आहे.