न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन मित्रांनी तरुणाचा खून केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या खून प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
निवल सुकलाल पावरा (वय २७), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी हिरा निवल पावरा (वय २१, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, मूळगाव सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबल्या उर्फ महेंद्र तेलगोटे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींच्या विराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हिरा पावरा यांचे पती निवल पावरा आणि आरोपी हे मित्र होते. आरोपी शुक्रवारी रात्री पावरा यांच्या घरी आले. तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे, असे आरोपी हे निवल पावरा याला म्हणाले. त्यानंतर निवल पावरा यांना हिंजवडी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आरोपी घेऊन गेले. तेथे आरोपी यांनी निवल पावरा याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून गंभीरजखमी करून त्याचा खून केला.
पोलिसांनी हिंजवडी, अहमदनगर, गेवराई, बीड, जालना येथे आरोपी यांचा शोध सुरू केला. आरोपी तेलगोटे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणाच्या वादातून मुलीसमोर मारहाण केल्याचा राग मनात धरून इतर त्याने इतर आरोपींसोबत मिळून निवल पावरा याचा खून केल्याचे त्याने कबूल केले.