न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- हिंजवडी येथून एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याचा आज सकाळी दहाच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन आला. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद खोलीचे कुलूप तोडून आत पाहिले असता सडलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
गणपत सदाशिव सांगळे (वय २५) रा. कळंब, इंदापूर हा लेबर कॉन्ट्रॅक्टर असून तो हिंजवडीमधील जांबे गावच्या हद्दीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. मात्र, त्याची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर सर्व स्पष्ट होईल. हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
















