न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने कासारवाडी येथील जैन स्थानकात आयोजित रक्तदान शिबिरात ७३ जणांनी रक्तदान केले. करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता मंडळाच्या वतीने यापूर्वी मे महिन्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.
त्या प्रसंगी ३७ जणांनी रक्तदान केले होते. त्यानंतर पुन्हा नुकत्याच घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरात सध्या जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता अशा रक्तदान शिबिरांची गरज आहे.
प्रा. अशोककुमार पगारिया, संदीप फुलपगर, विलास पगारिया, महावीर चानोदिया, राहुल, कल्पेश, मयूर आणि विपुल पगारिया, मकरंद शहापुरकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. मोरया रक्तपेढीच्या सहयोगाने हे शिबिर घेण्यात आले.















