न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे चिंचवड स्टेशन येथील उद्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुन्हा विकसित केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
चिंचवड रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्राच्या मागील बाजूस व गगनगिरी महाराज यांच्या मठासमोर रेल्वेच्या जागेत अस्वच्छता होत होती. हे चित्र बदलण्यासाठी पालिकेने तेथे सुंदर उद्यान उभारले. त्यासाठी रेल्वेची परवानगी मिळवली. १९९७ – ९८ मध्ये महापालिकेने लाखो रुपये खर्च करून या जागेत उद्यान विकसित केले मात्र, हे उद्यान पूर्णपणे भुईसपाट झाले असून तिथे उद्यान करताना बसवलेली कोनशिलासुद्धा पुसट झाली आहे.