न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ७ डिसेंबर) रोजी १३७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३५१५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८९७४७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६६८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष भोसरी (५७ वर्षे), वल्लभनगर (८५ वर्षे), मोशी (३४ वर्षे) ०१ स्त्री – थेरगाव (८२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष बारामती (८० वर्षे) येथील रहिवासी आहेत.















