न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघा विरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे.














