न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १५ डिसेंबर) रोजी १०७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४६३९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१३८२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७२१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली एक ५७ वर्षीय स्त्री रुग्ण असून निगडी येथील रहिवासी आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे सात पुरुष रुग्ण हे शिवणे (३६ वर्षे), शिरूर (७० वर्षे ), न-हे (७३ वर्षे), अम्रावती (४४ वर्षे), हिजवडी (५५ वर्षे), मुंबई (६६ वर्षे), शिरोली (५८ वर्षे) ०१ स्त्री – पेरणे (७२ वर्ष) येथील रहिवाशी आहेत.














