न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १६ डिसेंबर) रोजी १३८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४७७७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१४९३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७२४ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली तीन पुरुष रुग्ण चिंचवड (६५, ६१ वर्षे), काळेवाडी (६२ वर्षे) येथील रहिवासी आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले तीन पुरुष रुग्ण हे बारमुला (६८ वर्षे), शिरूर (५६ वर्षे ), आंबेगाव (६४ वर्ष) येथील रहिवाशी आहेत.














