- शहरात आज १२२ जणांना कोरोनाची बाधा; ९८ रुग्णांना डिस्चार्ज तर, १० रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १८ डिसेंबर) रोजी १२२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५०७० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१७०७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७३३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला एक पुरुष थेरगाव (५२ वर्षे) व एक स्त्री चिंचवड (५१ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष चिखली (६२ वर्षे, ४३ वर्ष), मोशी (५९ वर्षे), काळेवाडी (७६ वर्षे), रावेत (८२ वर्षे), ०२ स्त्री चिंचवड (७८ वर्षे), रहाटणी (४५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – बारामती ( ६२ वर्षे ), तळेगाव दाभाडे (६१ वर्षे), ०१ स्त्री कोंढवा (७८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील मागिल २४ तासात कोविड -१९ आजाराने मृत्यु झालेले रुग्ण संख्या ०१ एवढी आहे. तसेच यापूर्वी झालेल्या ६ मृत्युची माहिती आज पिं.चिं.मनपा / पिं.चिंमनपा बाहेरील वेगवेगळ्या रुग्णालयाकडून प्राप्त झाल्यामुळे अपडेट केली आहे.