- अकोला जातपडताळणी समितीच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांची साडेपाच महिन्यांतच बदली झाली आहे. त्यांची अकोला जातपडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गवळी हे १ जुलै २०२० रोजी प्राधिकरणामध्ये सीईओ ‘ म्हणून रूजू झाले होते. साडेपाच महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली आहे. गवळी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
माझी अकोला जातपडताळणी समितीच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्प, खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम व मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.














