पतीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- पंचनामा करीत असताना मयत महिलेच्या अंतर्वस्त्रात पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली. पतीच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा मजकूर त्यात आहे. ही घटना आकुर्डी येथे घडली.
रूपाली जयंत कांबळे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी जयंत एकनाथ कांबळे (४२, रा. पंचतारानगर, आकुर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी गुरुवारी (दि. २४) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रूपाली यांनी २० डिसेंबर रोजी दुपारी गळफास घेतला. मृतदेहाचा पंचनामा करीत असताना पोलिसांना अंतर्वस्त्रात एक चिट्ठी सापडली. त्यात पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


















