- मान्यताप्राप्त करोना प्रतिबंधक म्हणून ठरली ही जगातली पहिलीच लस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे.












