- रस्ता सुरक्षा व अपघातमुक्त प्रवासासाठी वाहतूक नियमांची शुभेच्छापत्रे..
- पिंपरी चिंचवड़ वाहतूक पोलिसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांतर्फे (दि. १) रोजी वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते वाहतूक शुभेच्छापत्र देण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा पत्रातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालन करणारे वाहन चालकाना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नुतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. वाहतूक शुभेच्छा पत्रामध्ये वाहन चालकांसाठी प्रतिज्ञा आणि वाहतुकीचे आदर्श नियम नमूद करण्यात आले आहेत. यावेळी वाहनचालकांनी वाहतूक प्रतिज्ञा घेतली. तसेच नववर्षानिमित्त स्मार्ट शहराच्या स्मार्ट नागरिकांनी वाहतूक नियम व सडक सभ्यतेचे पालन करण्याचा स्मार्ट संकल्प केला. सदरचा उपक्रम पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत राबविण्यात आला असून रस्तासुरक्षा व सडक सभ्यतेच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा व सडक सभ्यतेबाबत स्मार्ट संकल्प हा ऑनलाइन उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त वाहतूक डॉ. सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक श्रीकांत डीसले, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.