न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०१ जानेवारी) रोजी १२० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे १ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ० १ पुरुष – चिंचवड ( ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत. इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १४ प्रवाशी भारतात परतलेले नाहीत, ५० प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत व १६ प्रवाशांचा २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरीत १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १७३ नकारात्मक असून ७ अहवाल कोविड सकारात्मक आहे उर्वरित ८ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६७२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३४७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७५७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
















