- शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेत सोशल डिस्टंसिंगचे पालन – अरुण चाबुकस्वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रहाटणीतील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीअम स्कूल ही शाळा सुरु करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले, सर्व मुलांचे गुलाबाचे फुल देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. मुलांना, शिक्षकांना, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व मास्क संस्थेतर्फे देण्यात आले आहेत. शाळेत सॅनिटाईजर, मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकार नियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केलेली आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीनद्वारे करण्यात आले. तसेच सर्व वर्गखोल्या, ऑफिस व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वर्गात २०-२५ विद्यार्थी बसविण्यात आले आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पलता डीक्रूझ म्हणाल्या, “घरात ७-८ महिन्यापासून बसून असल्यामुळे मुलांची उत्सुकता वाढली होती. सगळे मित्र ,शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील असे झाले होते. ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या ते आता शाळेत आल्यानंतर कमी होतील व चांगले दर्जेचे शिक्षण मिळणार आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये. शाळांनाही मुलांची काळजी आहे. ”
















