- म्हाळुंगे, रावेत आणि शिरगावात होणार नवीन पोलीस ठाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाहन खरेदीसाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत सोमवारी (दि. ४) घेण्यात आला.