- पालिका शाळेत ३२ टक्के हजेरी तर, खासगी शाळेतही विद्यार्थीसंख्या अल्पच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- तिसऱ्या टप्यात ४ जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत.
महापालिकेची अठरा माध्यमिक विद्यालये आजपासून सुरू झाली. महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात केवळ विद्यार्थ्यांची ३२ टक्के हजेरी दिसून आली. तर काही खासगी संस्थांनीही शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवशी उपस्थिती अत्यल्प असल्याचे दिसून आले.
रुपीनगर, नेहरूनगरात कमी तर कासारवाडीत सर्वाधिक उपस्थिती होती. महापालिका क्षेत्रात महापालिकेची १८ माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी रुपीनगर, नेहरूनगरातील शाळेत ६ टक्के उपस्थिती होती. तर कासारवाडीतील शाळेत सर्वाधिक ६७.९२ टक्के उपस्थिती होती.
शाळेचे नाव, उपस्थिती, टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
१) केशवनगर शाळा ६७ २१.७३
२) संततुकारामनगर १८ ३९.१३
३) पिंपरीनगर १८ २६.२८
४) काळभोरनगर ५७ २६.४९
५) कासारवाडी १८ ६७.९२
६) पिंपळेगुरव २३४ ३६.४०
७) फुगेवाडी ३१ ३२.२९
८) निगडी। ८५ ३१.३०
९) वाकड ३३ २१.१०
१०) खराळवाडी। ५२ ५४.६९
११) भोसरी ८२ ३५.३४
१२) थेरगाव २७२ ४०.००
१३) पिंपळेसौदागर १४५ ५०.८४
१४) नेहरूनगर ४८ ६.७६
१५) आकुर्डी (उर्देू) २७। २५.००
१६) रुपीनगर ४७ ६.६५
१७) लांडेवाडी ४६ ४२.७०
१८) क्रीडा प्रबोधिणी ४० ४०.४५
………………………………….
एकुण – १३३५ ३२.५०