न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ११ जानेवारी) रोजी ९३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष- चिंचवड (७१ वर्षे), दापोडी (३२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – पुणे (७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८०६६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४६८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७७४ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















