- भाजपने रीतसर पालकमंत्री अजित पवारांना निमंत्रण द्यावे – राजू मिसाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र, पाटील यांच पिंपरी-चिंचवड शहरासाठी योगदान काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले नसल्याने निदर्शने करत या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध केला. सोडत असलेल्या नाट्यगृहाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगर पालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून त्याची सोडत आज चिंचवड येथील नाट्यगृह रामकृष्ण मोरे येथे होणार होती.
विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेच्या फसवणूक थांबवली असून, रावेत येथील आवास योजनेची जागा न्याय प्रविष्ट असल्याची सांगत पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रण नसल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांना रीतसर आमंत्रण भाजपाने द्यावे अस त्यांनी म्हटलंय.


















