न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १५ डिसें.) :- पोदार इंटरनँशनल स्कूलचा श्रवण बिजिगुप्पी याने रायपुर (छत्तिसगड) येथे झालेल्या राष्ट्रिय सीबीएसई स्केटिंग स्पर्धेत वय ( ग्रुप ८) ५०० मि. स्केटिंग ईनलाइन प्रकार मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
ही स्पर्धा कृष्णा पब्लिक स्कूल रायपुर (छत्तिसगड ) येथे झाली. प्राचार्य शहनाज कोटार, उपप्राचार्य अर्चना करंडे, मनीषा घोसरवाड़े यांनी श्रवणचे कौतुक केले आहे. क्रीडा शिक्षक आत्माराम काळे, प्रवीण दिघे, महेश कांबळे, सुप्रभात बांगर यांनी अभिनंदन केले आहे.












