NEWS PCMC NETWORK : मुंबई : केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या खास प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे यांची प्रमुख असलेल्या अमर फोटो स्टुडिओला रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या नाटकातील कलाकारांनी आपल्या दोन प्रयोगांमधून मिळणारं सगळं मानधन केरळमधील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
कधी आणि कुठे ?
२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे आणि रात्री ८.३० वा. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचे हे खास प्रयोग होणार आहेत. नुकतचं या नाटकाचं फोर्ब्सकडून कौतूक करण्यात आलं आहे.