- ऑटो क्लस्टरकडून शहरातील स्टार्टअपला नोंदणी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टीट्युट ही संस्था लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते. ऑटो क्लस्टरमध्ये विशेषत: वाहन उद्योग आणि अभियांत्रिकी या विषयाशी संबंधित प्रशिक्षण, सेमिनार्स, कार्यशाळा, बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे विपणन या विषयांसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. ऑटो क्लस्टरमध्ये वाहन उद्योगाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
१४ नोव्हेंबर २०१९ रोजी स्मार्ट सिटी मिशन, पिंपरी चिंचवड यांच्या अंतर्गत इन्क्यूबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली. शहरातील नव उद्योजकांच्या उद्योगविषयक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर आणि पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर यांच्या सहकार्याने इन्क्यूबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप युनिटची सुरुवात करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन देणे, स्टार्ट अपला सहाय्य करणे या मुख्य उद्देशाने इन्क्यूबेशन सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटरच्या वतीने लवकरच स्टार्ट अप डिरेक्टरी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे स्टार्ट-अप्सना परस्पर सहयोगाने व्यवसाय करण्यासाठी सहाय्य मिळेल. स्टार्ट अप डिरेक्टरीची माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाईन माहिती मागविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती, शासकीय योजना, नवनवीन उपक्रम आणि या बरोबर आणखी बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरण्याचे स्टार्ट अप्सना आवाहन करण्यात येत आहे.
फॉर्मच्या माध्यमातून मिळालेली माहिती संकलित करून लवकरच डिरेक्टरीच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहितीसाठी तसेच आपले स्टार्टअप रजिस्टर करण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप मध्ये जाऊन PCSIC Startup Directory सर्व्हे भरा.
लिंक:
●Play store – https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
●iOS – https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS


















