- पाच पोलीस निरीक्षक तर एका सहाय्यक निरिक्षकाची बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या तर एका सहाय्यक निरिक्षकाची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांवरील जबाबदाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्यांदा बदल्या करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस ठाणे, शिरगाव चौकी, पीसीबी / एमओबी गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक नियोजन यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक राजपूत – चाकण, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत वाहतूक नियोजन विभाग, पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर – एमओबी / पीसीबी, पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे – विशेष शाखा, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण – शिरगाव चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नाईक – एमओबी/ पीसीबी अशी पिंपरी-चिंचवड अंतर्गत बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व बदल्याचे ठिकाणे आहेत.