- प्रभाग अध्यक्षांकडून ७० कोटींच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘क’ क्षेत्रिय कार्यालयाचे सन २०२०-२०२१ चे र. रु . ५७,०४,३९.९६० रुपयांचे सुधारीत अंदाजपत्रक व सन २०२१-२०२२ चे र. रु. ६९.५६,२९,०००/- रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास मंजूरी देणेकामी बुधवार दिनांक १७/०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘ क ‘ क्षेत्रिय कार्यालयातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा आयोजित करणेत आली होती.
या विशेष सभेमध्ये आण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त, क क्षेत्रिय कार्यालय यांनी पि.चि.म.न.पा. ” क क्षेत्रिय कार्यालयाचे सन २०२०-२०२१ चे र.रु .५७,०४,३ ९.९६० / सुधारीत अंदाजपत्रक व सन २०२१-२०२२ चे र.रु .६९.५६,२९,००० / – मूळ अंदाजपत्रक राजेंद्र लांडगे, प्रभाग अध्यक्ष यांचेकडे मान्यताकामी सादर केले.
यावेळी नगरसदस्य राहुल गुलाब जाधव, अश्विनी संतोष जाधव, सारीका शिवाजी सस्ते, वसंत प्रभाकर बोराटे, बोइनबाड यशोदा प्रकाश, लोंढे नम्रता योगेश, भोसले राहूल हनुमंतराव, समीर मोरेश्वर मासुळकर तसेच नाना मोरे प्रशासन अधिकारी, श्री.संजय घुबे कार्यकारी अभियंता (स्थापत्य), नितिन देशमुख कार्यकारी अभियंता (विद्युत), वंसत उगले, लेखाधिकारी आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यावेळीच्या सन २०२०-२०२१ चे सुधारीत व सन २०२१-२०२२ चे मूळ अंदाज पत्रकास मंजूरी देण्यात आली.


















