- आज २३५ जणांना बाधा, ३४ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १७ फेब्रुवारी) रोजी २३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील एकाचाही मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०२२३७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८०९७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२७ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















