- दहा, वीस वर्षांनी एकदम दंड आकारणी अन्यायकारक; उद्योजकांची भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून कुदळवाडी – चिखली भागातील दोनशे पेक्षा जास्त उद्योजकांना जमीन एनए ( अकृषिक ) न करता अनधिकृतरित्या वापर केल्याबद्दल ४० पट दंड भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. उद्योजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दंड आकारण्याचा होता तर तो दर वर्षी नोटिसा देऊन का आकारला नाही? दहा, वीस वर्षांनी एकदम दंड आकारणी अन्यायकारक आहे. कोरोनाच्या संकटानंतर एवढा दंड भरणे शक्य नाही, असा पवित्रा संबंधित उद्योजकांनी घेतला.
संबंधीत उद्योजक आणि तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर तोडग्याबाबत चर्चा सुरू असतानाच चाळीस पट दंड भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने उद्योजकांत असंतोष पसरला आहे. कोरोनामुळे उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाचे नुकसान भरून काढण्यासाठी वर्षाला दंड न घेता तो एकदम दहा, वीस वर्षाचा दंड वसूल करणे कोणत्या नियमात बसते, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला.


















