- फेरीवाला आत्मनिर्भर योजनेस बँकांचा खोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- फेरीवाल्यानां कोरोना टाळेबंदीतून सावरण्यासाठी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत पीएम स्वनिधी योजनेतून दहा हजार कर्ज स्वरूपात देण्याची घोषणा करण्यात आली. यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात आले. मात्र बँकेचे अधिकारी कर्मचारी या योजनेला खोडा घालत असून, फेरीवाले बँकेत गेल्यास त्यांना हिन वागणूक देऊन योजनेस नकार देत आहेत.
याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे तक्रार करणार असुन टाळाटाळ करणाऱ्या बँकेसमोर लवकरच आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष तथा स्वनिधि योजनेचे सदस्य काशिनाथ नखाते यांनी दिला.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश संघटक आनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मधुकर वाघ, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, कासिम तांबोळी फरीद शेख, संभाजी वाघमारे, सय्यद अली, रामा बिरादार, अंबालाल सुखवाल, अनिता पवार, अंजली कदम, हरी भोई आदी उपस्थित होते.